पुणे : 'मनोहर अंबानगरी' लघुपटाचा देश-विदेशात बोलबाला, अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव
पुण्याच्या राहुल नरवणे या तरुणाची 'मनोहर अंबानगरी' ही शोर्ट फिल्म अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्र्टीय फिल्म फेस्टिवल मध्ये गाजत आहे. अंबाजोगाईचा इतिहास आणि संस्कृती शोर्ट फिल्मच्या माध्यमातून राहुलने मांडली आहे. यामधून अंबोजोगाईमध्ये असलेल्या अकराव्या शतकातील यादवकालीन पुरातन मंदिरांची ओळख करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणेज फक्त संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून या मंदिरांची ओळ करुन देण्यात आली आहे. दरम्यान, मनोहर अंबानगरी फिल्म आता अमेरिकेत दाखवण्यात येणार आहेत.