खेळ माझा : पुणे : राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या राहुल आवारेचा पुण्यात सत्कार
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारेचा काल पुण्यात सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी शरद पवारांच्या अनुपस्थितीत खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी अभिजीत कटके आणि किरण भगत यांच्यापाठोपाठ राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे या दोन्ही पैलवानांना शरद पवारांच्या वतीनं प्रत्येकी १२ लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली.