स्पेशल रिपोर्ट : पुणे : मार्केट यार्डमधील झोपडपट्टीला आग, आयुष्यभराच्या कमाईची डोळ्यादेखत राखरांगोळी

Continues below advertisement
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातली झोपड्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. अग्नीशमन दलाच्या 14 गाड्यांनी दोन तास शर्तीचे प्रयत्न करत ही आग नियंत्रणात आणली. सुरुवातीला एका घरात शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली. त्यानंतर घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग भडकली. या आगीत जवळपास 100 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दाट वस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे आग विझवण्यात अग्नीशमन दलाला अडचणी येत होत्या. सुदैवानं या आगीत कुठलिही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram