पुणे : अमेरिकन कंपन्यांच्या फायद्यासाठी भारतात नोटाबंदी, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
काही मोजक्या अमेरिकन कंपन्यांच्या फायद्यासाठी पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना देऊन त्याद्वारे डिजीटल व्यवहारासाठी यंत्रणा पुरवणाऱ्या कंपन्यांना फायदा मिळवून द्यायचा, असं यामागचं षडयंत्र होतं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. याआधी अमेरिकेतील कॅशलेसच्या मोहिमेमुळे याच कंपन्यांना मोठा तोटा झाला, त्याचीच भर काढण्यासाठी या कंपन्यांनी भारताकडे मोर्चा वळवला. त्यालाच मोदींनी साथ दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
Continues below advertisement