पुणे : उच्चभ्रू सोसायटीत रहिवाशाकडून घरावर डल्ला, 2 तासात आरोपी जेरबंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2018 09:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्याच्या चंदननगर परिसरात उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका रहिवाशानंच चोरी केल्याची घटना घडलीय...मात्र पोलिसांच्या खबऱ्यांमुळे अवघ्या 2 तासात ही चोरी पकडली गेली...6 मे रोजी अल्टीस ड्रोम सोसायटीत अग्रवाल यांच्या घरी कुणीही नसताना हिम्मत रीबेलानं हात मारला...तब्बल 10 लाख 16 हजार रुपयांचं सोनं त्यानं लंपास केलं...पोलिसांना माहिती मिळताच तपासाची चक्र फिरली...आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलं...विशेष म्हणजे आरोपीची बायको एका मल्टीनॅशनल कंपनीत आयटी इंजिनिअर आहे...मात्र आर्थिक चणचणीतून त्यानं ही चोरी केल्याचा अंदाज वर्तवला जातोय...दरम्यान हिम्मत रीबेलानं आणखी कुठे कुठे हात साफ केलाय याचा पोलिस शोध घेतायत..