पुणे : पालिकेत सायकल ट्रॅकचा प्रस्ताव गोंधळात मंजूर, राष्ट्रवादीचे नगरसेवक सायकल घेऊन सभागृहात

पुणे महापालिकेतील सर्वसाधारण सभेचा दिवस आज तुफानी गोंधळामुळे गाजला...त्यामुळे सायकल ट्रॅक योजना आणि घनकचरा हे 2 प्रस्ताव गोंधळामध्ये मंजूर करण्यात आले...सभा सुरु होण्याआधी भाजपचे काही नगरसवेक सायकलवरुन महापालिकेपर्यंत पोहोचले...मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवण्यासाठी थेट सभागृहातच सायकल आणल्यामुळे एकच गोंधळ उडाला...राष्ट्रवादी आणि काँग्रेस नगरसेवकांनी दोन्ही योजनांच्या प्रेझेंटेशनची मागणी केली...या गोंधळात शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी महापौरांसमोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला...मात्र भाजपच्या नगरसेवकांनी राजदंड काढून घेऊन जागेवर ठेवत दोन्ही प्रस्ताव मंजूर करुन घेतले...मात्र भाजपच्या किती नगरसेवकांनी मतदान केलं हे समजू शकलं नाही...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola