पुणे:चितळेंच्या दूध पिशव्यांमुळे प्लास्टिक बंदीची पोलखोल
राज्य सरकारनं प्लास्टिकबंदी करूनही फारसा उपयोग होत नसल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलंय.
कारण चितळेंच्या दूधाची पिशवी आणि विमल पान मसाल्यानंच सर्वाधिक कचरा होत असल्याचं सर्वेक्षणात उघड झालंय.
पुण्यातल्या स्वच्छ या संस्थेनं हे सर्व्हेक्षण केलंय. प्लास्टिकबंदीतून खाद्यपदार्थांच्या पिशव्यांना वगळण्यात आलंय. तसंच या प्लास्टिकचं पुनप्रक्रिया होत नाही, पुण्यात दररोज १२५ ते १३० टन कचरा साठतो, मात्र त्यातील केवळ ५० टक्केच कचऱ्याची पुनप्रक्रिया होऊ शकते, त्यामुळे उर्वरित कचरा तसाच पडून राहतो, असं या सर्व्हेक्षणातून समोर आलंय.