पिंपरी : धारदार शस्त्राने हल्ला करत पिंपरीत भाजप नगरसेवकाची हत्या

Continues below advertisement
आळंदीचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यात बालाजी कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

वडमुखवाडी येथे बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हल्ला केला. हल्ल्यात कांबळेंचा मृत्यू झाला. बालाजी कांबळे आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक आहेत. ते पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांचा छोटेखानी बांधकामाचा व्यवसाय होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram