पुणे : पीएचडीधारक तरुणांचं शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन
Continues below advertisement
राज्यातील पीएचडी आणि नेट-सेट उत्तीर्ण झालेल्या तरुणांनी पुण्यातील शिक्षण संचालनालयासमोर चार दिवसापासून आमरण उपोषण सुरु केलं आहे. सरकार प्राध्यापकांची भरती करत नसल्याचा आरोप करत या तरुणांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये 30 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे आणि नेट-सेट झालेल्या तरुणांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बहुतेकांना बेकारीचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनीही भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे
Continues below advertisement