पुणे: पेट्रोल-डिझेलचा भडका

जून महिना काही दिवसांवर आलेला असला तरी राज्याचं तापमान मात्र अद्यापही कायम आहे. खासकरुन विदर्भातल्या सर्व शहरांमध्ये ४० डिग्रीच्या वर तापमान आहे. त्यामुळे मान्सून कधी दाखल होतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकीकडे तापमान
वाढलेलं असताना दुसरीडे इंधन दराचाही भडका उडाला आहे.
काल पेट्रोलचे दर 33 तर डिझेल २६ पैशांनी वाढले. मागच्या सलग सात दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईतले इंधनाचे दर देशातल्या इतर महानगरांपेक्षा जास्त आहेत. तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये अनेक ठिकाणचे दर तर मुंबईहूनही अधिक आहेत. दरम्यान, येत्या काळात दर कमी होतील, असं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola