Pune Flood | पाहाणीसाठी की फोटोसाठी?, चंद्रकांत पाटलांविरोधात पुणेकरांच्या घोषणा | ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील बहुतांश भागात पावसानं हाहाकार माजवल्यानंतर आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मात्र, अरण्येश्वर परिसरात चंद्रकांत पाटील यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठीसाठी नाही तर पाटील हे फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला. तसंच पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
Continues below advertisement