पुणे : सरसकट नव्हे, आता पाच प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क
Continues below advertisement
विरोधकांबरोबरच सर्वसामान्य पुणेकरांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर पुणे महापालिकेने जाचक तरतूदी असणाऱ्या पार्किंग धोरणात बदल केले आहेत. याआधी सर्वच रस्त्यांवर पार्किंग शुल्क आकारलं जाण्याचा प्रस्ताव होता. मात्र काल रात्री झालेल्या मुख्यसभेत यात बदल करुन आता फक्त पाच प्रमुख रस्त्यांवर पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Continues below advertisement