स्पेशल रिपोर्ट : पुणे : गाडी पार्किंगच्या वादातून आयटी इंजिनियरची हत्या

केवळ घरासमोर गाडी पार्क करण्याच्या वादातून तिघांनी एका संगणक अभियंत्या तरुणाची लोखंडी रॉडने आणि दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना काल रात्रीच्या सुमारास लुल्लानगर परिसरात घडली. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. नेवल भोमी बत्तीवाला (वय - 39), असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी टुरिस्ट गाड्यांचा मालक यशवंत रासकर, याच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पण या घटनेनंतर माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola