पुणे : इन्क्युबेटर तापल्याने भाजलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू, चिमुकल्याच्या पालकांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
पुण्यातील वात्सल्य मॅटर्निटी होम हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरनं पेट घेतल्यानं नवजात अर्भक गंभीररित्या भाजल्याचा प्रकार घडला आहे. काल सकाळी घडलेल्या प्रकारानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विजयेंद्र कदम आणि त्यांची पत्नी स्वाती कदम या दाम्पत्याचं हे बाळ आहे. स्वाती यांचं सिझर झाल्यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं. मात्र त्या इन्क्युबेटरनं पेट घेतला. त्यात बाळ 80 टक्के भाजलं आणि त्यातच या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
Continues below advertisement