पुणे: महाराष्ट्र दिनी पानी फाऊंडेशनचं महाश्रमदान अभियान
Continues below advertisement
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर पानी फाऊंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रात महाश्रमदान अभियान आयोजित केलं आहे. अभिनेता आमीर खान यानं पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. प्रत्येक शहरातल्या लोकांनी पुढे येऊन गावातल्या लोकांसोबत पाणलोटाचं काम करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना आणि लोकांना आम्ही आमंत्रण देत आहोत असं सांगायलाही आमिर खान विसरला नाही.
Continues below advertisement