पुणे : डीएसकेंची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यासाठी अधिसूचना जारी

Continues below advertisement
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या मालमत्ता जप्तीची अधिसूचना निघाली आहे. 46 चारचाकी आलिशान गाड्या, डीएसकेंच्या कुटुंबीयांच्या आणि कंपनीच्या नावे असलेली विविध बँकांतील 276 खाती आणि पुणे आणि आसपासच्या 124 संपत्तींवर जप्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतलं. त्यानंतर डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक करण्यात आली.

डीएसकेंची मालमत्ता

फुरसुंगी, ता. हवेली, जिल्हा पुणे येथील डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लि. कंपनीच्या नावावर असलेल्या 95 मालमत्ता

शिरीष दिपक कुलकर्णी नावावरील फुरसुंगी येथील 12, मालेगाव येथील 4,  मिरज 1, रत्नागिरी 4,  नवाली तालुका पुरंदर येथील 2

दिपक सखाराम कुलकर्णी नावावारील पेरणे तालुका हवेली 3,  बाणेर येथील 2 फ्लॅट

डी  एस कुलकर्णी अँण्ड कंपनी (वैजयंती मुगदल) या नावावरील नाकीर्दा तालुका महाबळेश्वर येथील एक मालमत्ता

अशा एकूण 124 मालमत्तांसह कुटुंबीतील विविध व्यक्तींच्या नावावर असलेली विविध बँकातील 276 खातीही गोठवण्यात येणार आहेत.

आलिशान कारही जप्त होणार

रॉयल एनफिल्ड यासह विविध दुचाकी आणि बीएमडब्ल्यू झेड-4, टोयोटा लँण्ड क्रुजर, फॉर्च्युनर, पोर्शे, बीएमडब्ल्यू 650 सीवॅट, बीएमडब्ल्यू 740 एलआय, ईटीऑस लिवा, एमव्ही ऑगस्था एफ 4 आरआर, ऑडी क्यू-5, अशा 40 चारचाकी जप्त केल्या जाणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram