पुणे : पुण्यातील शेकडो कोटींचे भूखंड बिल्डरच्या घशात?


पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याने घेतलाय. बाणेरमधील एक आणि कोथरूमधील 3 असे तीनशे कोटी रुपयांहून अधिकचे हे 4 भूखंड आहेत. विशेष म्हणजे हे भूखंड निवासी करावेत असा प्रस्ताव महापालिकेतूनच नगरविकास खात्याकडे गेला. त्यानंतर तो तात्कळ तो मंजूर होऊन त्याबाबतची अधिसूचनाही निघाली. एवढं सगळं होईपर्यंत आपल्याला याची कल्पनाच नव्हती असा अजब दावा महापालिकेतील सत्ताधारी करतायत. तर राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपच्या स्थानिक नागरसेवकांचाही विरोध आहे. एवढ्या मोक्याच्या भूखंडांवरील आरक्षण उठवल्यास त्याला विरोध होऊ शकतो हे ध्यानात घेऊन नगरविकास खात्याने पुणेकरांकडून या निर्णयाबद्दल हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. जागृत पुणेकर याबाबत हरकती नोंदवतीलही. मात्र त्या हरकतींची दखल राज्य सरकार घेणार का हा खरा प्रश्न आहे .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola