पुणे : लग्न करुन महिलेकडून वृद्धाची फसवणूक, पैसे आणि फ्लॅट बळकावला
Continues below advertisement
महिलेने वृद्धाची फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली आहे. आपल्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देत एका 35 वर्षीय महिलेने पोपटलाल गांधी यांच्याशी विवाहदेखील केला. मात्र दोन दिवसांनी त्या महिलेने पहिल्या नवऱ्याला बोलावून पोपटलाल गांधी यांना मारहाण केली, तसंच त्यांचे पैसे आणि फ्लॅटही बळकवला. दरम्यान पोलिसांनी महिला, तिचा पती आणि खोटी कागदपत्रं बनवणाऱ्या वकिलाला अटक केली आहे.
Continues below advertisement