पुणे : नो पार्किंगमधील गाडी चालकासह उचलली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 May 2018 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनो पार्किंगमध्ये लावलेली गाडी उचलताना टोईंग कर्मचाऱ्यांना अडवणाऱ्या चालकालाही दुचाकीसह उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विमाननगरमध्ये बुधवारी 30 मे रोजी हा प्रकार घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूर पोलिसांच्या समक्ष दुचाकीस्वाराला उचलण्यात आलं.
विमाननगरमधील लुंकड प्लाझासमोर दुचाकीस्वाराने आपली गाडी पार्क केली होती. गाडी नो पार्किंगमध्ये असल्यामुळे टोईंग व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी गाडी टो करण्यास सुरुवात केली. गाडीवर दुचाकीस्वार बसलेला पाहून कर्मचाऱ्यांनी त्याच्यासह दुचाकी उचलून टेम्पोत टाकली.