पुणे : नऊ वर्षांनंतरही फ्लॅटचा ताबा नाही, टोळीचा अनेकांना गंडा
फ्लॅट देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये घेऊन नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार पुणे शहरात उघडकीस आला आहे. 2009 साली एस. के डेव्हलपर्स अँड बिल्डर्सनी वाडे बोल्हाईच्या हद्दीत साडे सात लाख रुपयात फ्लॅट देण्याची जाहिरात दिली होती. त्यामुळे अनेक जणांनी पैसे भरुन फ्लॅटचं बुकिंग केलं. 36 महिन्यात ताबा देण्याचं आश्वासन बिल्डरने दिलं असताना नऊ वर्ष पूर्ण होऊनही ग्राहकांना ताबा मिळालेला नाही