पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत धनंजय मुंडेंचा सरकारवर निशाणा
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. नव्या प्रदेशाध्यपदाच्या निवडीसाठी शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील यांच्याबरोबर साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
महाराष्ट्राबरोबरच पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे.
मात्र गेल्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्या निवडीनंतर आगामी निवडणुकींमध्ये राष्ट्रवादीला किती फायदा होते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.