पुणे : जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी, पक्षाकडून अधिकृत घोषणा

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची वर्णी लागली आहे. पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. शरद पवार यांच्या पुण्यातील मोती बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर पुण्यात जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram