पुणे : नायलॉनच्या मांज्याचा तातडीने बंदोबस्त करा, सुवर्णा मुझुमदार यांच्या कुटुंबियांची मागणी
Continues below advertisement
कोर्टाने नायलॉन मांज्यावर बंदी घातल्यानंतरही तो अनेक ठिकाणी विकला जातोच कसा, असा सवाल मांज्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सुवर्णा मुजुमदार यांच्या बहिणीने विचारलाय. काही दिवसांपुर्वी सुवर्णा मुजुमदार आपल्या गाडीने घरी जात असताना रस्त्यावरील मांज्याने त्यांचा गळा कापला गेला होता.आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी पिंपरीतही एका मुलीवर मांजामुळे डोळा गमावण्याची वेळ आली होती. राज्यात इतरत्रही नॉयलॉनच्या मांज्यामुळं अनेकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर मुके प्राणी आणि पक्ष्यांनाही मांज्यामुळे आपला जीव गमवावा लागला. असं असताना हा मांजा मुलांना मिळतोच कसा हा खरा प्रश्न आहे.
Continues below advertisement