पुणे: बिबट्याच्या मदतीला नागरिक धावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हल्ली अपघात घडले की प्रत्यक्षदर्शींचे हात मदतीऐवजी मोबाईलच्या कॅमेऱ्याकडे वळतात. मात्र पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा अपघात याला अपवाद ठरलाय. रविवारच्या रात्री नारायणगाव हद्दीत दोन वर्षीय बिबट्याला एका वाहनाने ठोकर दिली. बिबट्या जखमी झाल्याचं पाहून नागरिकांचा जीव व्याकुळ झाला. जीवाची पर्वा न करता ते त्याच्या मदतीला धावले. बिबट्या म्हटल्यावर सहसा नागरिक चार हात लांब राहनंच पसंत करतात. आणि मात्र यावेळी नागरिकांनी बिबट्याच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र उपचार केल्यानंतरही बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या मृत्यूनंतर नारायणगावच्या ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.