पुणे : नागराज मंजुळेंनी शुटिंगसाठी उभारलेला सेट काढावा लागणार
Continues below advertisement
सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंना पुणे विद्यापीठाने धक्का दिलाय... आगामी सिनेमा झुंडच्या चित्रिकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं मैदान भाड्यानं देण्यात आलं होतं.. मात्र त्यावरून झालेल्या गदारोळावरून अखेर हा सेट हटवण्याचे आदेश पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिलेत... चित्रपटाच्या शूटिंगसाठी उभारलेला सेट सात दिवसात काढण्याच्या सूचना मंजुळे यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या सात दिवसात मंजुळे यांना आपला सेट काढून, मैदान जैसे थे करावे लागणार आहे. दरम्यान, सेट उभारण्यासाठी मंजुळे यांनी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सील, जिल्हा प्रशासन आणि उच्च शिक्षण संचालनालय या कुणाचीच परवानगी घेतलेली नव्हती असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरुंनी हा सेट काढण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement