
Free Parking | आता पुण्यात मॉल्समध्ये फ्री पार्किंग, महापालिकेच्या मॉल मल्टिप्लेक्सना सूचना | पुणे | ABP Majha
पुण्यात आजपासून सर्व मॉल्स आणि मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग नि:शुल्क करण्याचा निर्णय झाला. पुणे महापालिकेनं शहरातील सर्व मॉल आणि मल्टिप्लेक्सना तशा सूचनाही दिल्या. मागील आठवड्यात पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीनं मॉलमध्ये पार्किंग शुल्काच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी पार्किंग नि:शुल्क करण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानंतर पार्किंग निःशुल्क करण्याचा निर्णय राबवण्यासाठी महापालिका प्रशासनानं एक आठवडा घेतला. मात्र त्यानंतर देखील हा निर्णय फक्त कागदावरच राहिल्याचं दिसून येतं.