पुणे : मुजुमदार वाड्याची दूरवस्था, आमदार अनंत गाडगीळ यांच्याकडून 10 लाखांची मदत

Continues below advertisement
पुण्यातल्या कसबा पेठेतील ऐतिहासिक मुजुमदार वाड्याच्या दुरावस्थेची बातमी एबीपी माझाने लावल्यानंतर या वाड्याला अनेक राजकीय नेत्यांनी भेट देऊन मदतीचा हात दर्शवला आहे. या वाड्याला यंदाच्या गणेशोत्सवावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने वाड्याच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनंत गाडगीळ यांनीे 10 लाख रुपयांची मदत आमदार निधीतून देण्याचे जाहीर केले. शहरातील ऐतिहासिक मुजुमदार वाड्याशेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे वाड्याला धोका उत्पन्न झाला होता. त्याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने 1714 पासून सुरु असणारा गणेशोत्सव यंदा बंद होईल का काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. या वाड्याचे मालक अनुपमा मुजुमदार यांनी महापालिका आणि इतर आमदार नेत्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. जर यांनी वाड्यासाठी मदत केली तर ऐतिहासिक वाडा जतन करून पुढील पिढीला याचा अभ्यास करण्यासाठी मदत होऊ अस त्यांच म्हणणं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram