VIDEO | विकासकामं रखडवणाऱ्या कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा : खा. गिरीश बापट | ABP Majha

पुण्यातील विकासकामं रखडवणाऱ्या लबाड अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा नवनियुक्त खासदार गिरीश बापट यांनी दिलाय. पुण्यात सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा आज खासदार बापट यांनी घेतला. त्यावेळी कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती त्यांनी घेतली. संसदेच्या अधिवेशनाला रवाना होण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर केलेल्या कामाची माहिती पत्रकारांना दिली. त्याचबरोबर शहरातील पाणीपुरवठा, नदीसुधार प्रकल्प, नदीकाठ विकास, शहरांतर्गत वर्तुळाकार मार्ग अशा काही प्रकल्पांबाबत आपण समाधानी नसल्याचं त्यांनी सांगितलं. या कामांचा प्रगती अहवाल प्रत्येक  आठवड्याला देण्याचे आदेश बापट यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola