UNCUT : पुण्यातील मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यातील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement
जातीय नाही, आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. जातीय आरक्षणामुळे समाजात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरत असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. विरोधीपक्षात असताना सध्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील गळ्यात कापडी फलक घालून मराठा आरक्षणाची मागणी करत होते. आता सत्तेत येऊन चार वर्ष झाली, मग आरक्षण का दिलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. आधीचं सरकार असो वा आत्ताचं, फक्त नागरिकांच्या भावनांशी खेळ होतो आहे, अशी टीकाही त्यांनी केली. जातीय आरक्षणामुळे समाजात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरत आहे. महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींनी हे आरक्षणाचं राजकारण समजून घ्यायला हवं. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच मिळायला हवं. देशात आरक्षणाचं राजकारण सुरु झालं ते माजी पंतप्रधान व्हीपी सिंग यांच्यामुळे, असं राज ठाकरे म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram