Pune Wall Collapse | पुण्यातील दुर्घटनंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर : आ. योगेश टिळेकर | ABP Majha
पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.
पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे