पुण्याच्या रस्त्यावरुन रणगाडा नेताना जवानांची मोठी कसरत | पुणे | एबीपी माझा
आज विश्रांतवाडीमधे एक गमतीशीर प्रकार पहायला मिळाला. सैन्याचा एक रनगाडा बॉंबे स्यापर्स या संस्थेतुन डीआरडीओं या दुसऱ्या ठिकाणी न्यायचा होता. मात्र त्यासाठी जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. पुण्यातील लोकं रनगाड्यालाही रस्ता देत नाहीत आणि रनगाड्याला हॉर्न नसतो त्यामुळे या रनगाड्याच्या पुढे सैन्याचा एक ट्रक हॉर्न वाजवत चालत होता. रस्त्याच्या कडेला कुठेही उभ्या केलेल्या गाड्या, पादचारी यांना हटवण्यासाठी जवानांना वेळोवेळी ट्रकमधुन उतरावं लागतं होतं आणि गाड्या रस्त्यातून बाजूला कराव्या लागत होत्या. तरीही लोकं आपल्याच धुंदीत होते. काही दुचाकीवाल्यांनी तर रनगाडा आणि त्याच्यापुढे चालणार्या ट्रकच्या मधुन वाहनं आडवी घातली. पाठीमागून रनगाडा आलाय तरी एक महिला रस्त्यातुन चालत होती. पुण्यातील वाहततूक समस्या आणि त्याकडे पाहण्याचा पुणेकरांचा दृष्टीकोन यातुन स्पष्ट होत होता. एकवेळ युद्धाच्या मैदानात चाल करून जाणं या रनगाड्याला सोपं ठरलं असतं मात्र पुण्यातील रस्त्यांवरुन प्रवास करणं या रनगाड्यासाठी अडथळ्यांची शर्यत ठरली.