पुणे : मिलिंद एकबोटेंच्या घरासमोरील कॉन्स्टेबल अचानक गायब, पोलिसांचा हलगर्जीपणा
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटेंच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी मिलिंद एकबोटेंच्या शिवाजीनगरमधील घराबाहेर पुणे ग्रामीण पोलिसांनी चोवीस तास पाळत ठेवली आहे.
शनिवारी एकबोटेंच्या घराबाहेर दयानंद निम्हण नावाच्या पोलिस हवालदाराला त्यासाठी तैनात करण्यात आलं होतं. सकाळपासून निम्हण एकबोटेंच्या घराबाहेर लक्ष ठेऊन होते.
दुपारी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे विभागाचं एक पथक पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली एकबोटेंच्या घरी त्यांचा शोध घेण्यासाठी पोहचलं. मात्र तेव्हा त्यांना त्याठिकाणी दयानंद निम्हण आढळून आले नाहीत.