पुणे : मिलिंद एकबोटेंना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
Continues below advertisement
हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप एकबोटे यांच्यावर आहे.
काल सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली.
राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली होती.