पुणे विभागातील म्हाडाच्या 3139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत

पुणे : म्हाडातर्फे पुणे विभागातील 3 हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी 30 जूनला सोडत निघणार आहे. यासाठी आजपासून (रविवार) नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत असलेले अर्जदाराचे सरासरी उत्पन्न 25 हजारांपर्यंत असण्याची अट आहे. आयटी इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी आणि सिंहगड रोडला 30 जूनला संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola