Mhada Lottery | हक्काचं घर मिळालं, पुण्यासह पिंपरीत 4756 जणांना म्हाडाची लॉटरी | ABP Majha
Continues below advertisement
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या अनेकांचं आज स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय. पुणे म्हाडा कार्यालयानं एकूण ४७५६ सदनिकांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. आज या सदनिकांच्या सोडत झाली. ४७५६ सदनिकांसाठी ४१,५०१ अर्ज आले होते. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनीही उपस्थिती लावली. म्हाडा तर्फे येत्या २ वर्षांमध्ये २० हजार पेक्षा जास्त घरं उपलब्ध होतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी 3800 घरांची जाहिरात निघणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement