पुणे : ब्राह्मण महासंघाकडून मनपा आवारात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचं पूजन
Continues below advertisement
दादोजी कोंडदेवांवरुन पुन्हा एकदा पुण्यातलं राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. कारण, आज पुणे महापालिकेच्या प्रांगणात दादोजी कोंडदेवांची प्रतिमा आणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं पूजन केलं आहे. यावर पुणे महापालिका काय भूमिका घेते, हे पाहणंही महत्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटवून तो पु.ल.देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला होता. त्यावरुन पुण्यात बराच गदारोळ झाला होता.
Continues below advertisement