पुणे : पत्नी, दोन मुलींची हत्या करुन व्यावसायिकाची आत्महत्या, कर्जबाजारीपणातून कृत्य
Continues below advertisement
प्लास्टिक मोल्डिंग व्यावसायिकाने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. शिवणे उत्तमनगर भागात राहणाऱ्या 39 वर्षीय निलेश चौधरी यांनी कर्जबाजारीपणातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
पोलिसांना शनिवारी सकाळी 10 वाजता या घटनेची माहिती मिळाली. 7 वर्षीय श्रिया, 10 वर्षीय श्रावणी आणि 31 वर्षीय पत्नी नीलम यांचे मृतदेह बेडरुममध्ये, तर निलेश यांचा मृतदेह हॉलमध्ये पंख्याला दोरीने लटकलेल्या अवस्थेत सापडला. पत्नी आणि मोठी मुलगी श्रावणी यांच्या तोंडातून फेस येत होता.
आर्थिक कारणावरुन आत्महत्या करत असल्याचा उल्लेख निलेशने सुसाईड नोटमध्ये केला आहे. चौघांचे मृतदेह ससूनमध्ये पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर शेजारचे सगळे दाराला कुलूप लावून निघून गेले आहेत.