'महाराष्ट्र केसरी' किताबासाठी गतविजेता पैलवान अभिजीत कटके सज्ज | पुणे | एबीपी माझा
अभिजीत कटकेनं किरण भगतला हरवून महाराष्ट्र केसरी किताबावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं, त्याला आता एक वर्ष लोटलंय. पुण्याच्या भूगावातून महाराष्ट्र केसरीचा अश्वमेध आता जालन्यात दाखल झालाय. येत्या १९ ते २३ डिसेंबर या कालावधीत जालन्यात महाराष्ट्र केसरीचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे शहरचा अभिजीत कटकेही यंदा पुन्हा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या इराद्यानं दाखल होणार आहे. महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्यातल्या शिवरामदादा तालमीत अभिजीतचा सराव कसा सुरू आहे, हे त्याच्याशी बोलून जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी मिकी घईनं.