Gold Saree | श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो वजनाची सोन्याची साडी अर्पण | ABP Majha
पुण्यातल्या सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची ही साडी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.