पुणे, महाबळेश्वरमध्ये मान्सूनपूर्व सरींची हजेरी
Continues below advertisement
एकीकडे पुण्यात कृष्णमेघांनी गर्दी केली असताना साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्येही मान्सूपूर्व सरींनी हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे पुण्यात अंधार दाटून आला आहे. मात्र उकाड्यापासून सुटका झाल्याने पुणेकरांनी सुस्कारा सोडला. तसंच महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरातही पावसानं हजेरी लावली. मान्सून उद्या गोव्यात वर्दी देणार असल्याचं भाकित हवामान खात्यानं वर्तवलं आहे. त्यामुळे कोकणाच्या मार्गे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल अशी आशा आहे.
Continues below advertisement