पुणे: खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डब्बा घसरला, मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबई- पुणे मार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन खाली उतरला... यामुळं मुंबई-पुणे या मार्गावरील गाड्या 20 मिनिटं उशिरानं धावतायत. मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास बोगी रुळावरुन खाली घसरली. ही बोगी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. खंडाळ्याजवळ रेल्वेच्या मागच्या इंजिनचं प्रेशर अचानक वाढल्यानं बोगी रुळावरुन खाली घसरली. यामुळं डाऊन लाईनवरील वाहतूक बंद आहे. यामुळं मुंबईकडून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे मिडल लाईनवरुन धावत आहेत.