पुणे : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सव
अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव आयोजित केला आहे. या निमित्तानं बाप्पांना 11 हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवून आरास करण्यात आली आहे. देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. हे नववं वर्ष आहे. तर तिकडे मुबंईतील शिवाजी पार्कमध्ये असणाऱ्या उद्यान गणेश मंदिरात यांच आंब्यांपासून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.