पुणे : बुधवार पेठेच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये सापडला जिवंत मोर
पुण्यातील बुधवार पेठेच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये चक्क जिवंत मोर सापडलाय. जे के मार्केटच्या इमारतीच्या टेरेसवर मोर आढळून आला. स्थानिकांनी याची माहिती पक्षीमित्रांना दिली. त्यांनी टेरेसवर जाऊन मोराला ताब्यात घेतलं. हा मोर पुर्ण वाढ झालेला, पिसारा असलेला आहे. जखमी अवस्थेत असल्यानं हा मोर उडू शकत नव्हता. मोराला उपचारासाठी कात्रजच्या उद्यानात नेण्यात आलंय