पुणे: मावळच्या कुंडमळ्यात 17 वर्षीय तरुणी वाहून गेली
तिकडे मावळच्या कुंडमळ्यात दोन तरुणी वाहून गेल्या आहेत. यातील एका तरुणीला वाचवण्यात यश आलंय. एक भाऊ, दोन सख्ख्या बहिणी आणि दोन त्यांच्या नात्यातील वहिणी असे पाचजण फिरायला गेले होते. यातील दोन बहिणींचा पाय घसरुन त्या वाहून जाऊ लागल्या. तिथं उपस्थिती असलेल्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि एकीला बाहेर काढलं. मात्र, दुसरी मुलगी वाहून गेली. एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलंय. शालिनी चंद्रबालन असं वाहून गेलेल्या मुलीचं नाव आहे.