पुणे : पिठाच्या गिरणीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

Continues below advertisement
पीठाच्या गिरणीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. सुप्रिया प्रधान असं या महिलेचं नाव असून आज सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गोखले नगर परिसरात हा अपघात घडला आहे.

पुण्यातील गोखले नगर परिसरात सुप्रिया प्रधान या मेस चालवत होत्या. आज संध्याकाळी पीठाच्या गिरणीत काम करताना त्यांची ओढणी गिरणीत अडकली. त्यामुळे त्या गिरणीच्या यंत्रात ओढल्या गेल्या. तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांना बाहेर काढून जवळच्याच रत्नाकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram