पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी 12 आरोपींना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरेगाव भीमा इथं एक जानेवारीला झालेल्या हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आलं आहे. त्यापैकी नऊ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत. हे सर्व बारा आरोपी कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील आहेत. दोन्ही गटातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 1 जानेवारीला विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोक आले होते. त्यावेळी दगडफेक झाली आणि हिंसाचारा झाला होता.