पुणे : कर्वेनगरमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली आल्याने दोघे जखमी
पोलीस निरीक्षकाने बेजबाबदारपणे गाडी चालवत पार्किंगमध्ये झोपलेल्या दोन व्यक्तींच्या पायावर गाडी घातल्याचा प्रकार समोर आलाय. कर्वेनगरमधील या घटनेत दोन जण जखमी झालेत. सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. संबंधित पोलीस निरीक्षक चंद्रकांत बिद्रे याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे. कर्वेनगरमधील सिद्धी संकल्प सोसायटीच्या पार्किंगमध्ये दोन व्यक्ती झोपल्या होत्या, त्यावेळी या सोसायटीचे रहिवासी असलेले बिद्रे कार घेऊन आले आणि ती कार झोपलेल्या व्यक्तींच्या पायावर गेली. यावेळी कार पार्क करुन बिद्रे हे वर असलेल्या फ्लॅटमध्ये निघून गेल्याचीही माहिती मिळतेय.