पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेवर विरोधकांचा आक्षेप

Continues below advertisement

पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय... कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी 215 कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली.. मात्र रस्त्यासाठी केवळ 40 टक्केच जमीन ताब्यात घेण्यात आल्यानं यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला... रस्त्यासाठी 100 टक्के जागा ताब्यात नसताना निविदा का काढण्यात आली असा प्रश्न विरोधकांनी उभा केलाय... एकूण क्षेत्रफळापैकी 80 टक्के जागा ताब्यात असेल तरच राज्य किंव्हा केंद्र सरकारकड़ून एखाद्या रस्त्याचं काम हाती घेण्यात येतं... मात्र महापालिकेकड़ून अशा प्रकरारच्या कामांसाठी मार्गदर्शक तत्वे नसल्याने हे काम सुरु करावे की नाही याबाबत विरोधकांनी आक्षेप घेतलाय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram