पुणे/भिलवाडा : पद्मावतवर बंदीच्या मागणीसाठी करणी सेनेची निदर्शने

Continues below advertisement
पुण्यातही करणी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. लाल महालासमोर येत पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेनं जोरदार आंदोलन केलं. सरकारनं पद्मावती चित्रपटावर बंदी घातली नाही तर अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा करणी सेनेनं दिलाय. तर तिकडे
राजस्थानच्या भीलवाडात एक युवक ३५० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला आहे. भूपेन्द्र सिंह राठोड असं या युवकाचं नाव असून तो राजस्थानच्या भीमडियास गावचा रहिवासी आहे. पद्मावत चित्रपटावर जोपर्यंत बंदी घातली जात नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा दावा त्यानं केलाय. या युवकाच्या हातात पेट्रोलने भरलेली बाटली आहे. याच टॉवरच्या खाली करणी सेनेचे कार्यकर्तेही आंदोलन करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram