पुणे : शाळेत कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू
शाळेत कबड्डी खेळताना चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील नवोदय विद्यालयात शनिवारी हा प्रकार घडला. आठवीत शिकणाऱ्या गौरव अमोल वेताळचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कबड्डी खेळताना चक्कर येऊन गौरव एकाएकी पडला होता. या घटनेचा व्हिडिओही चित्रित झाला आहे. पुण्यात शिरुर तालुक्यातील पिंपळे जगतापमधील नवोदय विद्यालयात शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.